भारत देश हे विविध ऋतूंचे घर आहे. उत्तर मध्ये थंडगार वातावरण तर दक्षिणेमध्ये गर्मीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. भारतातील अनेक भागात अनेक प्रकारचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्या भारत देशात पर्यटनासाठी अनेक पर्यटक जगभरातून येतात तर काहीजण भारतातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून येतात. सध्या उन्हाळा जवळ येत आहे. मात्र भारताच्या काही भागात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याचे प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण या गर्मीने ग्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकजण या वेगवेगळ्या थंड जागेच्या ठिकाणी जाण्यास तिकिट्स बुक करत आहेत. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला आहे की उन्हाळ्यात फिरण्यासाठी कुठे गेल्यावर आपल्याला थंडीचे अनुभव करायला मिळेल हाच प्रश्न पडत आहे. चला तर जाणून घेऊया भारतातील कोणत्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला थंडीचा अनुभव घ्यायला मिळेल.
1 - द्रास:
जम्मू - काश्मीरमधील कारगिल जिल्यात असलेले द्रास भारतातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की हिवाळ्यात द्रासचे तापमान -४५° सेल्सिअस पेक्षा खाली जाते. बर्फाच्या कुशीत असलेला द्रासचा गोठवणारा थंड वातावरण भारतातील सर्वात थंड पर्यटन स्थळांपैकी एक बनवते.
2 - सियाचीन ग्लेशियर:
इथे असणाऱ्या लष्करी नियंत्रणांमुळे सियाचीन ग्लेशियर पर्यटकांसाठी खुले जरी नसले तरीदेखील हे भारतातील सर्वात थंड ठिकाण म्हणून ओळखले जाते. थंडीमध्ये सियाचीन ग्लेशियरचे तापमान -५०° सेल्सिअस पेक्षा खाली आहे. ज्यामुळे सियाचीन ग्लेशियर भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. भारतातील सर्वात थंड ठिकाणांच्या यादीत सियाचीन ग्लेशियर एक विशेष स्थान आहे.
3 - लेह:
लडाख हे उत्तर भारतातील लडाखची राजधानी आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून विशेष ओळख आहे. अनेक पर्यटक विविध ठिकाणाहून इथे दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. जर तुम्हाला बर्फाळ ठिकाणी नवनवीन साहसी अडव्हेंचर करायचे असतील तर लेह यासाठी लोकप्रिय आहे.
4 - मुन्नार:
मुन्नार ठिकाण त्याच्या हिरवेगार आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे. मुन्नार हे ठिकाण केरळमध्ये असून इथल्या बर्फाळ ठिकाणाला अनुभवण्यासाठी अनेक लाखो पर्यटक जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून येतात. इथल्या सुंदर दृश्यांना पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात.