मुंबई : भारतात तुळशीला पवित्र मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा केली जाते. तुळशी पावित्र्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. तुळस अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे.

तुळसीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. तसेच रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी तुळस महत्त्वाची भूमिका बजावते. तुळशीमध्ये मॅग्नेशियम असल्याने स्नायूंना आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

तुळशीची पाने खालल्याने ताण कमी होऊन मानसिक स्वास्थ सुधारते.त्याचबरोबर रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ होतो. त्यातील आवश्यक तेले तुमचे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करू शकतात.

तुळशीमधील आवश्यक तेल, युजेनॉल, लिनालूल आणि सिट्रोनेलॉलमुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते. तसेच हृदयरोग आणि आतड्यासंबंधीच्या समस्यादेखील दूर होतात.

तुळशीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे श्वसन, लघवी, ओटीपोटात आणि त्वचेचे संक्रमण असेल तर तुळशी बॅक्टोरियाशी लढण्यास मदत करते. दमा लागत असेल तर तुळस गुणकारी ठरते. एका अभ्यासातून समोर आले आहे की जर दमा लागत असेल तर तुळस वायुमार्गाची सूज कमी करू शकते. श्वास घेण्यास अडचण होत असेल तर तुळशीमुळे श्वास घेण्यास मदत होते. आणि वायुमार्गाची जळजळ कमी करणे हा तुळशीचा सामान्य वापर आहे.