रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: गेल्या काही दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने राज्यभरात विविध अलर्ट जारी करण्यात आले आहेत. अशातच, पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा, मावळ येथील स्मारके पर्यटनस्थळे, धरणे यासारख्या सर्व पर्यटन स्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी असणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आणि कायद्याच्या नियमात अडचणी येऊ नयेत म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बंदी घातली आहे. पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा: विक्रोळी उड्डाणपूल होणार वाहतूकीसाठी खुला
पुण्यातील 'या' पर्यटनस्थळांवर बंदी:
एकविरा देवी मंदिर
कारला लेणी
भांजे लेणी
भांजे धबधबा
लोहगड किल्ला
विसापूर किल्ला
तिकोना किल्ला
टायगर पॉईंट
लायन्स पॉईंट
शिवलिंग पॉईंट