देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. आता यानिमित्त महाराष्ट्र एसटी महामंडाळ एक स्तुत्य उपक्रम राबवणार आहे. याबद्दलची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
याबद्दल सरनाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एसटीच्या प्रमुख ७५ बसस्थानकांवर सर्व सामान्य नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरु करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांची संकल्पना आहे.
हेही वाचा - Disha Patani House Firing Case : दिशा पटानीच्या बहिणीच्या 'त्या' पोस्टमुळे घरावर हल्ला झाल्याचा संशय, सीसीटीव्ही फुटेजही समोर
वाचनालयात ठेवण्यात येणारी पुस्तके ही एसटी कर्मचाऱ्यांकडे नोंद करुन लोक आपल्या घरी घेऊन जाऊ शकतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही मौलिक संदर्भ ग्रंथ देखील या फिरत्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील.
हेही वाचा - Water Supply: कल्याण एमआयडीसीसह अनेक भागात पाणीबाणी, या तारखेला बारवी धरणातील पाणी 24 तासांसाठी बंद
मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारा 'वाचन कट्टा' एसटीच्या बसस्थानकावर निर्माण करून अनमोल भेट या निमित्ताने जनतेला आम्ही देत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.