विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: 'आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीचालकांना आणि वारकऱ्यांना शासकीय मदतीत वाढ करावी', अशी मागणी माजी जि.प. सदस्य डॉ. सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा: 'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावे. अन्यथा...'; अन्न सुरक्षा आयुक्तांचा इशारा
निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी:
'शासनाकडून दिंडी चालकांना 20,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, वारीचा कालावधी एक महिना असतो. यामध्ये खूप खर्च येतो. त्यामुळे ही रक्कम थेट 50,000 रुपयांपर्यंत करण्यात यावी. पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी अपघाती विमा आर्थिक मदत वाढविण्याची मागणीही निवेदनात केली आहे. वारकरी आणि भाविकांना आरोग्य तसेच शुद्ध पाणी या सेवा सरकारी पातळीवर प्राधान्याने पुरविण्यात यावे', अशी मागणी माजी जि.प. सदस्य डॉ. सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.