Sunday, August 31, 2025 11:25:44 AM

मुंख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रभाव

महायुती सरकार ने सुरु केलेली लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे

मुंख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रभाव

मुंबई: महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची संधी मिळणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:

आर्थिक आधार: महिलांना आर्थिक स्थैर्य प्रदान करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश आहे. यामुळे महिलांना त्यांच्यातील सामर्थ्य ओळखण्याची आणि त्यांचा जीवनस्तर सुधारण्याची प्रेरणा मिळेल.

सन्मानाचा भाव: योजना केवळ निधीपुरती मर्यादित नसून, महिलांच्या आत्मसन्मानाला चालना देणारी आहे. सन्मान निधी प्राप्त करून महिलांना समाजात प्रतिष्ठा आणि आदर मिळवता येईल.

सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील.

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेमुळे महिलांना सन्मान निधी मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.”

राज्य शासन महिलांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे, आणि या योजनेमुळे महिलांना केवळ आर्थिक स्थैर्य मिळणार नाही, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा आत्मविश्वासही मिळेल. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल आणि त्या समाजात उच्च स्थान मिळवू शकतील.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा:

https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t


 


सम्बन्धित सामग्री