मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार आहेत. परंतु आझाद मैदानात मराठा आंदोलक जमले आहेत. मुंबईला येताना ठिकठिकाणी जरांगेंचं भव्य स्वागत करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक बदल करण्यात आला आहे. जे. जे. पूल बंद करण्यात आला. तसेच मराठा बांधवांची जे. जे. पुलावर अडवणूक करण्यात आली.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वूभमीवर मुंबईत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाशीकडून येणाऱ्या आणि साऊथ बॉम्बे पांजरपोळकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्राम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहे.
Manoj Jarange Protest: जरांगेंच्या आंदोलनाला कोणत्या नऊ लोकप्रतिनिधींचा पाठिंबा?, आंदोलनासाठीच्या नेमक्या अटी काय?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. आज सकाळी मनोज जरांगे मुंबईत पोहोचले आहेत. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहेत. मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.