Wednesday, August 20, 2025 05:59:01 PM

भाजप मविआला धक्का देण्याच्या तयारीत?

भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीला धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतील खासदार संपर्कात असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप मविआला धक्का देण्याच्या तयारीत

मुंबई : भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीला धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतील खासदार संपर्कात असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मविआतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. लवकरच महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मविआतील खासदार भाजपा आणि इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचा चर्चा आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

 

मविआतील खासदार राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. लोकसभेत भाजपाला महाराष्ट्रात यश मिळालं नव्हतं. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


सम्बन्धित सामग्री