Thursday, September 11, 2025 09:39:11 AM

Charlie Kirk Death : भर कार्यक्रमात गोळीबार ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

चार्ली किर्क हा डोनाल्ड ट्रम्प यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे.

charlie kirk death  भर कार्यक्रमात गोळीबार  डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

अमेरिकन उजव्या विचारसरणीचे नेते आणि टर्निंग पॉइंट यूएसएचे प्रमुख चार्ली किर्क यांची एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना 10 सप्टेंबर 2025  रोजी युटा व्हॅली विद्यापीठात घडली, जिथे चार्ली किर्क एका  कार्यक्रमात सहभागी होते.या हत्येमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. चार्ली किर्कची हत्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. चार्ली किर्क हा डोनाल्ड ट्रम्प यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात आहे.

चार्ली किर्कच्या हत्येबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करून या घटनेची माहिती दिली. ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. चार्ली किर्क युटा व्हॅली विद्यापीठात आयोजित एका वादविवादात सहभागी होण्यासाठी आले होते. यादरम्यान ते तंबूखाली माइक धरून बोलत होते, तेव्हा अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गळ्याला लागली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा- Solar Eclipse 2025 : चंद्रग्रहण झालं.. आता वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होणार; भारतावर काय परिणाम होईल? जाणून घ्या, सुतक काळ 

ट्रम्प यांनी व्यक्त केले दु:ख : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर किर्कबद्दल एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, "महान चार्ली कर्क आता या जगात नाहीत. अमेरिकन तरुणांना त्याच्यापेक्षा चांगले कोणीही समजले नाही. सर्वजण त्याला प्रेम करतात, त्याचा आदर करतात, मेलानिया आणि मी त्याची पत्नी एरिका आणि संपूर्ण कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो.

हेही वाचा- Nepal Protest: हिंसाचारग्रस्त नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला; सरकारला केले मदतीचे आवाहन 

31 वर्षीय चार्ली किर्क हे एक प्रमुख उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते होते. कर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक होते. 2024 च्या निवडणुकीत ते त्यांच्या टीमचा भाग होते. ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतके जवळचे होते की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना तरुणांचे हृदय समजून घेणारी व्यक्ती म्हटले. चार्ली चार्ली किर्कची तरुणांवर चांगली पकड होती. कर्क हे इस्रायलचे मोठे समर्थक देखील होते.
 


सम्बन्धित सामग्री