Sunday, August 31, 2025 11:53:18 AM

मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा; अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ

मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. ज्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली ती गाडी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची होती.

मनसे नेत्याच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ

मुंबई: मनसे नेत्याच्या मुलाने दारू पिऊन एका कारला धडक दिली. ही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. ज्या गाडीला मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली ती गाडी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेची होती. या अपघातानंतर, राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात मनसे नेत्याचा मुलगा राहील शेख हा अर्धनग्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. तसेच, राहीलने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्रीला शिवीगाळ देखील केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर; 17 दिवसांमध्ये तब्बल 19 वेळा ढगफुटी

नेमकं प्रकरण काय?

राजश्री मोरे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख दारूच्या नशेत होता. अपघातानंतर राहिल शेखने शिवीगाळ करत, 'पैसे घे, जा आणि पोलिसांना सांग, मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल', अशी धमकी राहील शेखने दिली आहे. इतकंच नाही, तर संबंधित व्हिडिओमध्ये राहील शेखने घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसला. तो पोलिसांना सहकार्य करण्यास नकार देत आक्रमक वर्तन करत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात राजश्रीने राहील शेखविरोधात एफआयआर दाखल केला असून, तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून एफआयआरची प्रतही शेअर करण्यात आली आहे.

राजश्रीने आरोप केला आहे की, राहिल मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता आणि वडिलांच्या राजकीय पदाचा वापर करून धमकी देत होता. इतकच नाही तर, एफआयआर नोंदवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्याला सतत धमक्या मिळत असल्याचेही तिने म्हटले आहे. राजश्रीच्या सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा: बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेला सोमवारपासून सुरुवात

यापूर्वीही राजश्री मोरे चर्चेत होती

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यापूर्वी एका व्हिडिओमुळे चर्चेत होती. मराठी भाषेच्या वापरावर मनसेच्या जोरदार आग्रहाबद्दल तिने नाराजी व्यक्त केली होती. 'इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी स्वतः अधिक मेहनत करावी', असं राजश्री मोरे म्हणाली. मुंबईतील स्थलांतरितांमुळेच स्थानिक मराठी लोकांची परिस्थिती अधिक खराब होणार नाही', असा दावा करत तिने वाद निर्माण केला होता. राजश्रीच्या या विधानानंतर वर्सोवा परिसरातील मनसे कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजश्रीने जाहीर माफी मागितली आणि संबंधित व्हिडियो तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हटवण्यात आला. 
 


सम्बन्धित सामग्री