Sunday, September 21, 2025 12:53:22 PM

Katrina Kaif Pregnancy: प्रेग्नन्सीच्या अफवांनंतर कतरीना कैफचा बेबी बंप फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरीना कैफ या प्रेग्नेंसीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा आली आहे.

katrina kaif pregnancy प्रेग्नन्सीच्या अफवांनंतर कतरीना कैफचा बेबी बंप फोटो व्हायरल नेमकं सत्य काय

Katrina Kaif Pregnancy: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरीना कैफ या प्रेग्नेंसीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात ती बेबी बंपसह दिसत आहे, मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. या फोटोमुळे चाहत्यांनी लगेचच प्रतिक्रिया दिल्या आणि कॉमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

कतरीना आणि विकी कौशल यांचे लग्न 2021 मध्ये झाले होते. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. विशेषत: या वर्षी जेव्हा कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना बेबी गर्ल झाली, त्यावेळी कतरीना प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत होती. आता व्हायरल झालेल्या फोटोमुळे चाहत्यांची उत्सुकता पुन्हा शिगेला पोहोचली आहे. 

व्हायरल फोटोमध्ये कतरीना एका ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसत आहे. काही लोक म्हणत आहेत की ती कदाचित एखाद्या जाहिरातीसाठी शूट करत आहे. मात्र फोटोमध्ये चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेकांना असे वाटते की फोटो खरा आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचा दावा आहे की हा फोटो AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून बनवलेला असू शकतो. त्यामुळे फोटोच्या सत्यतेवर अजून प्रश्न उपस्थित आहेत.

चाहत्यांची प्रतिक्रिया पाहता, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे . कतरीना कैफच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे मीडिया आणि सोशल मीडिया दोन्ही प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांना अधिकृत पुष्टी मिळण्याची आतुरता आहे, परंतु अद्याप कतरीना किंवा विकी कौशल यांनी यावर कोणताही खुलासा केलेला नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये कतरीना अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम करत राहिली आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्यातील व्यस्ततेमुळे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे याबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, चाहत्यांचे कमेंट्स आणि अफवांमुळे हे प्रकरण अजून चर्चेचा विषय बनले आहे.

एकूणच, कतरीना कैफच्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. मात्र चाहत्यांचे प्रेम आणि उत्साह पाहता, सोशल मीडिया आणि मीडियामध्ये चर्चेचा रंग वाढत आहे. चाहत्यांना आता फक्त अधिकृत बातमीची वाट पहावी लागणार आहे.


सम्बन्धित सामग्री