वर्षा मोरे. प्रतिनिधी. अकोला: गुरुवारी दुपारी गुजरात येथील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर जेव्हा टेक ऑफ करत होता, तेव्हा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. सुदैवाने, या अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली. ज्या ठिकाणी हा विमान कोसळला होता, त्या मेडिकल कॉलेजमध्ये ऐश्वर्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे.
ऐश्वर्या नेमकी बचावली कशी?
ज्या मेडिकल कॉलेजमध्ये विमान कोसळले होते, त्या कॉलेजमध्ये ऐश्वर्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. जेव्हा, हे विमान या मेडिकल कॉलेजमध्ये कोसळले होते, तेव्हा ऐश्वर्या हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावर झोपली होती. जेव्हा अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते, तेव्हा ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला. घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना म्हणजेच अमोल तोष्णीवाल यांना फोन केला आणि घटनेबद्दलची माहिती दिली.