Friday, August 22, 2025 04:16:15 AM

बुलढाण्यातील तीन आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी

भाजपने जाहीर केले बुलढाणा जिल्ह्यातील तीन आमदारांची उमेदवारी

बुलढाण्यातील तीन आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी

बुलढाणा : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या पहिल्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील तीन आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. खामगाव मतदारसंघातून आमदार आकाश फुंडकर, चिखली मतदारसंघातून आमदार श्वेता महाले आणि जळगाव जामोद मतदारसंघातून आमदार संजय कुटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आमदार आकाश फुंडकर हे खामगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करीत आहेत. त्यांनी सांगितले की, "या निवडणुकीत मी केलेल्या विकास कार्याच्या आधारावर मतदार माझ्यावर विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा मला निवडून आणतील."

श्वेता महाले आणि संजय कुटे यांनाही पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे. भाजपच्या या निर्णयाने बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि सर्व आमदार आपल्या कार्यामुळे पुन्हा एकदा निवडून येण्याच्या तयारीत आहेत.


 


सम्बन्धित सामग्री