Sunday, August 31, 2025 11:13:17 AM

Mumbai-Goa Highway Traffic : चाकरमानी खोळंबले ! मुंबई-गोवा हायवेवर लांबच लांब रांगा, जाणून घ्या कुठे किती ट्रॅफिक?

रेल्वे, बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शनिवार 23ऑगस्ट 2025 पासून चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मात्र  मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.

mumbai-goa highway traffic  चाकरमानी खोळंबले  मुंबई-गोवा हायवेवर लांबच लांब रांगा जाणून घ्या कुठे किती ट्रॅफिक

गणपतीच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. मुंबई-पुण्यातून चाकरमान्यांची पावलं आता कोकणाकडे वळली आहेत. कोकणात जाण्यासाठी रेल्वे, बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शनिवार 23ऑगस्ट 2025 पासून चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मात्र  मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी हजारोंच्या आसपास एसटी बसेस  सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले होते. त्यातील काही बसेस सोडण्यात आल्या असल्याने महामार्गावर गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. 

हेही वाचा - Ganeshotsav 2025: मुंबईतील GSB सेवा मंडळाला विक्रमी 474 कोटींचं विमा कवच; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह गणेशोत्सवासाठी व्यापक सुरक्षा 

 मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव, लोणारेजवळील परिसरात सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी टोलमाफी दिली आहे.

हेही वाचा - Mumbai Metro Update: भाविकांच्या सोयीसाठी MMRDAचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावणार मुंबई मेट्रो

त्याचप्रमाणे प्रशासनाने गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 600 पेक्षा अधिक पोलीस आणि गृहरक्षक दलाचे जवान मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी तैनात केले आहेत.  


 


सम्बन्धित सामग्री