Thursday, September 04, 2025 02:52:54 PM

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज

मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई पोलीस दलातील आठ अतिरिक्त आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2184 पोलीस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात असणार आहेत.  

हेही वाचा : नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरकरांची खवय्येगिरी

मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांची तपासणीसाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. फिरता बंदोबस्त आणि फिक्स पॉइंट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात देखील पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणाऱ्या आणि अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या व्यक्ती यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.  


सम्बन्धित सामग्री