Wednesday, September 03, 2025 12:52:19 PM

नवाब मलिक मानखुर्दमधून उमेदवारी अर्ज भरणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना उमेदवारी दिलेली नाही. पण नवाब मलिक मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

नवाब मलिक मानखुर्दमधून उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना उमेदवारी दिलेली नाही. पण नवाब मलिक मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ते २९ ऑक्टोबर रोजी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. अपक्ष लढायचे की विशिष्ट पक्षाच्यावतीने निवडणूक लढवायची याचा निर्णय २९ रोजी जाहीर करणार असल्याचे संकेत नवाब मलिक यांनी दिले. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्याऐवजी त्यांची मुलगी सना मलिक हिला अणुशक्तिनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 

नवाब मलिकांना भाजपाचा विरोध

नवाब मलिक यांच्यावर १९९२ च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित असलेल्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. आर्थिक व्यवहारातून अप्रत्यक्षपणे देशविघातक कारवायांना बळ प्राप्त करुन दिल्याचा संशय त्यांच्याविषयी व्यक्त होत आहे. याच कारणामुळे भाजपाने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही.


सम्बन्धित सामग्री