Sunday, August 31, 2025 09:23:27 AM

अमरप्रीत सिंह भारताचे नवे वायुदलप्रमुख होणार

अमरप्रीत सिंह भारताचे नवे वायुदलप्रमुख अर्थात एअर चीफ मार्शल म्हणून सोमवार ३० सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

अमरप्रीत सिंह भारताचे नवे वायुदलप्रमुख होणार

नवी दिल्ली : अमरप्रीत सिंह भारताचे नवे वायुदलप्रमुख अर्थात एअर चीफ मार्शल म्हणून सोमवार ३० सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. ते फेब्रुवारी २०२३ पासून वायुदलात व्हाईस एअर मार्शल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सेंट्रल एअर कमांडचे नेतृत्व केले आहे. 

भारतीय वायुदलाच्या सेवेत १९८४ पासून असलेल्या अमरप्रीत सिंह यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या प्रभावीरित्या हाताळल्या आहेत. आता ते वायुदलाचे प्रमुख ही जबाबदारी हाताळणार आहेत. ते सध्याचे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. एअर चीफ मार्शल चौधरी ३० सप्टेंबर रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री