पुणे : भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यासह कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. जाहीर केलेल्या दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यामुळे आयोगाने नोटीस बजावली आहे. उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीने या प्रकरणात समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही तर आयोग नियमानुसार पुढील कारवाई करण्याबाबत निर्णय घेईल.