Sunday, August 31, 2025 10:16:58 AM

'समीर भुजबळांनी दिला राजीनामा'

समीर भुजबळ यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

समीर भुजबळांनी दिला राजीनामा

मुंबई : समीर भुजबळ यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. समीर भुजबळ हे छगन भुजबळांचे पुतणे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम करत होते. उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण महायुतीच्या गणिताचा समतोल साधताना तिकीट मिळणार नाही, याची जाणीव झाल्यावर समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी समीर भुजबळांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.


सम्बन्धित सामग्री