Wednesday, September 03, 2025 05:03:59 PM

मराठी का येत नाही? विचारले म्हणून तरुणाला.....

मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे.

मराठी का येत नाही विचारले म्हणून तरुणाला

ठाणे : मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाहीअसं एका मराठी तरुणानं विचारलं. त्यावरून वाद निर्माण झाला.

मुंब्य्रात मराठी हिंदी भाषेचा वाद विकोपाला गेला आहे. फळविक्रेत्याला मराठी भाषा का येत नाही असे विचारल्याने हा वाद झाला. परंतु मुंब्रा पोलिसांनी मराठी भाषिक तरुणावरच गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मुंब्य्राच्या भाषा वादाची दखल आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी मराठी तरूणाची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे. ही आतापर्यंतची चौथी घटना आहे. आधी कल्याणमध्ये अशी घटना घडली. त्यानंतर ठाणे, नालासोपारा आणि आज परत ही घटना घडली. जर एखाद्या मुलाला महाराष्ट्रात मराठीत बोल असं सांगतल्यावर माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे. तुम्ही आम्हाला  अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन काय उपयोग असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

 

हेही वाचा : देशमुख हत्येप्रकरणी आरोपी विष्णू चाटेने दिली मोठी कबुली

 

नेमकं काय घडलं?

आज मुंब्य्रामध्ये विशाल गवळी हा मराठी तरुण फळे विकत घेण्यासाठी गेला. विशालने मराठीत फळांचा दर विचारला. त्यावर फळविक्रेता संतापला आणि मला मराठी येत नाही, तू हिंदीत बोल असे म्हणाला. गवळ या तरुणाने महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही असे विचारले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्या वादविवादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जमाव त्याठिकाणी जमला. त्यानंतर गवळीला कान पकडून माफी मागायला सांगितली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


सम्बन्धित सामग्री