Sunday, August 31, 2025 09:30:35 AM

नवी मुंबईत कोरोनाचे 19 रुग्ण; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

गुरुवारी नवी मुंबईतही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी नवी मुंबईत 4 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 19 कोरोना बाधित रुग्ण आहेत.

नवी मुंबईत कोरोनाचे 19 रुग्ण नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

कविता लोखंडे, प्रतिनिधी, नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच, गुरुवारी नवी मुंबईतही कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी नवी मुंबईत 4 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 19 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यासह, गुरुवारी 21 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. सोबतच, 2 रुग्णांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: पुराच्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पाच जणांचे प्राण वाचवणारे 'खाकी वर्दीतील खरा हिरो'

कोविडबाबत, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि नाहक भीतीचे वातावरण पसरवू नये, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र सर्दी, खोकला, फ्लू सदृश लक्षणे आढळल्यास वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा, तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि जवळच्या मुंबई महानगरपालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री