राकेश रामटेके. प्रतिनिधी. गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या महामार्गावरील अंजोरा आणि साखरी टोला या दोन गावांच्या परिसरात नागरिकांना दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी दुपारी अंजोरा गावाजवळ काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाले. त्यांनी या वाघाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला असून, या घटनेनंतर वनविभागाने खबरदारी घेत परिसरात आपल्या संघांना पाठवले आहेत. वाघ हा गावाशेजारी असल्यामुळे रेस्क्यू टीमला देखील वनविभागाच्या वतीने पाचारण करण्यात आले आहे.
हेही वाचा: एअर इंडियाकडून 8 उड्डाणं रद्द; चार आंतराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश
डीडब्ल्यूच्या फेब्रुवारी 2025 च्या लेखानुसार, 2025 मध्ये भारतातील वाघांची संख्या सुमारे 3 हजार 682 असण्याचा अंदाज वर्तवला आहे. ही संख्या जागतिक वन्य वाघांच्या लोकसंख्येच्या अंदाजे 75% इतकी आहे. संवर्धन प्रयत्नांमुळे अलिकडच्या वर्षांत भारतातील वाघांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.