Thursday, September 04, 2025 02:51:44 PM

बेपत्ता मुलीचा मृतदेह घरातील एका पेटीमध्ये आढळल्याने खळबळ

घरातील पोटमाळ्यातील एका पेटीमध्ये बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे, देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ उडाली असून अद्याप या चिमुकलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.

बेपत्ता मुलीचा मृतदेह घरातील एका पेटीमध्ये आढळल्याने खळबळ

तळोजा औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या देवीचापाडा गावातील माऊली कृपा इमारतीमध्ये राहणारी दोन वर्षांची चिमुकली मंगळवार, दिनांक 25 मार्च रोजी दुपारपासून बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या पालकांनी यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बुधवारी, 26 मार्च 2025 रोजी घरातील पोटमाळ्यातील एका पेटीमध्ये बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे, देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ उडाली असून अद्याप या चिमुकलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.


मृतदेह आढळला घरातील एका पेटीत:

हर्षिका शर्मा असे मृत बालिकेचे नावं असून देवीचा पाडा गावातील विनायक मेडिकल जवळील माऊली कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तिचे कुटुंब राहत होते. मंगळवारी दिनांक 25 मार्च रोजी, चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तळोजा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीमध्ये मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आपली दोन वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याचे म्हटले. मात्र, संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पावणेपाच वाजले. तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी अपहरणाचा संशय व्यक्त करत तपासाला सुरुवात केली होती. हे कुटूंब ज्या इमारतीमध्ये राहतात त्याच्याजवळ त्यांचे काही नातेवाईकदेखील राहतात. 

तळोजा औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या देवीचापाडा गावातील माऊली कृपा इमारतीमध्ये राहणारी दोन वर्षांची चिमुकली मंगळवारपासून बेपत्ता होती. आपली मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटूंबीयांनी यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, बुधवारी 26 मार्च 2025 रोजी घरातील  पोटमाळ्यावरून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्यामुळे जेव्हा कुटुंबीयांनी शोध घेण्यास चालू केले, तेव्हा त्यांना पोटमाळ्यात असलेल्या एका पेटीमध्ये बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह आढळला. यामुळे देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ माजली. मात्र तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेनंतर, नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी घटनास्थळी गुरुवारी, 27 मार्च 2025 रोजी भेट दिली. 


सम्बन्धित सामग्री