मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपाने पहिली यादी जाहीर केली. या यादीत ९९ उमेदवारांची नावं आहेत. आता महायुतीतील भाजपाचे मित्र पक्ष अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष त्यांच्या उमेवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची पहिली यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवार जाहीर करण्यात महायुतीने आघाडी घेतली आहे. तर मविआ अद्याप जागावाटपाचा तिढा सोडवत आहे. जागावाटपावरुन शिउबाठाच्या प्रतिनिधींचे काँग्रेस आणि राशपसोबत वाद सुरू असल्याचे वृत्त आहे. वादामुळे मविआचे जागावाटप लांबणीवर पडले असल्याचे समजते.