Thursday, September 04, 2025 02:23:51 PM

राष्ट्रवाद आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी फडणवीस-बावनकुळे यांच्यावर जबाबदारी : गडकरी

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण, अटल बिहारी वाजपेयींच्या कार्याची आठवण

राष्ट्रवाद आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी फडणवीस-बावनकुळे यांच्यावर जबाबदारी  गडकरी

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाची आठवण दिली. त्यांनी वाजपेयींच्या नेतृत्वात देशाच्या विकासाच्या दिशेने केलेल्या कार्याचा गौरव केला. गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी दर्शवली. राष्ट्रवाद आणि समाजहिताची भावना व्यक्त करत गडकरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गौरवले आणि देशाच्या कल्याणासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

"मी कधी सत्कारामध्ये जात नाही आणि सत्कारही करत नाही, पण ज्या नागपूरच्या दोन नेत्यांनी एवढं मोठं यश मिळवले आहे, त्यांचं गौरव करणे आणि आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा आनंदाचा क्षण असावा, हे महत्त्वाचे आहे." असे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

गडकरी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या विकासाच्या दिशेने केलेल्या कार्याचा उल्लेख केला. "अटल बिहारी वाजपेयी हे आपले मार्गदर्शक नेते होते. 19९६ मध्ये ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपल्या कार्याची सातत्याने सुरू ठेवली, यामुळेच भारताला प्रगतीची दिशा मिळाली," असे गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी भूतकाळातील इतिहासाचा उल्लेख करत भविष्याच्या दिशेने काम करण्याचे महत्त्व सांगितले. "मधल्या काळात वोट बँक पॉलिसीवर काम झाले, परंतु अटल बिहारी वाजपेयी यांनी केवळ देशाच्या विकासासाठीच काम केले. भारत हा सेक्युलर देश आहे, आणि तो काँग्रेस किंवा भाजपामुळे नाही, तर भारतीय हिंदू समाजाच्या सहनशीलता आणि संस्कृतीमुळे आहे," असे गडकरी यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

यावेळी गडकरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान राम, आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांबद्दलही आपल्या प्रेमाचे आणि आदराचे भाव व्यक्त केले. "आम्ही जात, पंथ आणि भाषेच्या पलीकडे जाऊन देशाच्या विकासासाठी एकत्र काम करायचं आहे," असे गडकरी यांनी स्पष्ट केले.


देवेंद्र फडणवीस यांच कर्तृत्व हा महाराष्ट्र बदलल्याशिवाय राहणार नाही
 "महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल दिला. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. त्यांना कधीही कुटुंबाच्या आस्थेसाठी राजकारणात आणण्याचा आग्रह झाला नाही," यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या महत्त्वावर जोर दिला आणि त्यांना "पार्टीचे खरे विश्वस्त" म्हणून गौरवले. "देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या बदलासाठी महत्त्वाचे आहे, आणि ते बदलल्याशिवाय राहणार नाही," अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

 "राष्ट्रवाद हा आपला आत्मा आहे. राष्ट्र सुखी आणि समृद्ध व्हावे, हेच आपलं ध्येय आहे. देशाच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला सुखी आणि समृद्ध करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वर आहे," 

जो आपल्या आई-वडिलांना मुला बाळांना सुखी ठेवू शकत नाही.. त्यांनी देशाचा कल्याण करण्याची गरज नाही.... पहिले घर सांभाळावा आणि मग देशाचा कल्याण विचार करावा असे स्पष्ट मत गडकरी यांनी व्यक्त केले. 

 


सम्बन्धित सामग्री