दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका तरुणाने समाज माध्यमावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला. यानंतर यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आली. यवतप्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. सोशल मीडियावर पोस्टमुळे तणाव निर्माण झाला. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. काही ग्रामस्थ आणि गावाबाहेरील काही व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत बैठक झाली होती असेही पोलिसांनी सांगितले आहे.
यवतमध्ये नेमकं काय घडलं?
26 जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरात पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळ्याच्या विटंबनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झाले. प्रकरण ताजं असताना तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये तणाव वाढला. जमावाकडून तरुणाच्या घराची तोडफोड केली गेली. यामुळे दोन गटांत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.