गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते. आता ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. वाशीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. काही वेळातच जरांगे आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक संपूर्ण तयारीनीशी मुंबईत दाखल झाले आहेत.
हेही वाचा - Manoj Jarange: मनोज जरांगेंचं वाशीत जोरदार स्वागत; काही वेळातच जरांगे आझाद मैदानावर पोहोचणार
दरम्याने या आंदोलनासाठी मात्र काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. फक्त 5 हजार आंदोलकांनाच आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुख्य आंदोलकांसह फक्त 5 वाहनांनाच मैदानात परवानगी दिली.अशातच आंदोलक लांबून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. हे आंदोलन नक्की कधीपर्यंत चालणार आहे त्याबद्दल कोणतीही खात्री नसल्याने सोबत सर्व शिदोरीच घेऊनच आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. याबद्दलची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.