laxman hake on manoj jarange patil
आमचा ओबीसीतून आरक्षणाला विरोध आहे. जरांगेंचं आंदोलन हे सत्तेतील आमदार आणि खासदारांनी उभं केलं आहे. जरांगे हा फक्त चेहरा आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सत्तेत बसणाऱ्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आणि राजकारण करण्याचा डाव आहे. पण या प्रयत्नांमध्ये ओबीसींचं आरक्षण ७५ % संपलं आहे आणि उरलेलं २५ % आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी बांधवांना आणि भटक्या विमुक्त जातीतील बांधवांना विनंती आहे की जर १०-१५ % लोक रस्त्यावर उतरून व्यवस्था वेठीस धरत असतील तर तुम्हीदेखील तुमचा हक्क मागितला पाहिजे. आपल्यालादेखील आरपारची लढाई लढायची आहे.
पुढे ते म्हणाले की, आज उद्या काय होतय ते पाहू. त्यानंतर आम्हीदेखील रस्त्यावर उतरू आणि ज्या आमदारांनी जरांगेंना पाठींबा दिला त्यांना दाखवून देऊ.