मुंबई: मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहे. नुकतच त्यांचं वाशीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता त्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने चालला आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना काही आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिला आहे.
मनोज जरांगे यांना 6 आमदार आणि २ खासदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित आणि राजू नवघरेंचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या एका आमदारानं देखील जरांगेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
जरांगेंना कोणाचा पाठिंबा?
आ. प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी
आ. राजू नवघरे, राष्ट्रवादी
आ. विलास भुमरे, शिवसेना
आ. संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी श.प.
खा. बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी श.प.
आ. कैलास पाटील, शिवसेना उबाठा
खा. संजय जाधव, शिवसेना उबाठा
खा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना उबाठा
आंदोलनासाठी अटी
मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातील मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती मात्र त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिली. परंतु काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. फक्त 5 हजार आंदोलकांनाच आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुख्य आंदोलकांसह फक्त 5 वाहनांनाच मैदानात परवानगी दिली. फक्त एक दिवस आंदोलनाची परवानगी देण्यात आली. शनिवार, रविवारी आंदोलनाला परवानगी नाही. मोठ्या संख्येनं आलेल्या आंदोलकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. सकाळी 9 ते सायं. 6 पर्यंतच आंदोलनाला परवानगी दिली आहे. वेळ संपल्यानंतर आंदोलकांना मैदान लगेच सोडावं लागणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.