मुंबई : राज्यातील काही शहरांमध्ये दुचाकीस्वारांसोबतच पाठीमागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक शहरात देखील हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे, दुचाकीस्वारांचा मृत्यू आणि गंभीर जखमांमध्ये वाढ झाल्यामुळे, या निर्णयाचा उद्देश सुरक्षा वाढवणे आहे. राज्यात ५ वर्षांतील रस्ते अपघातांचा आढावा घेतल्यानंतर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले.
तसेच, वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये अंमलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले. या निर्णयामुळे नाशिकसह राज्यभर दुचाकी चालक आणि सहप्रवाशांवर हेल्मेट नसल्यास कारवाई केली जाईल.